निमित्त मराठा क्रांती मोर्चा . ….!

Author: Share:

निमित्त मराठा क्रांती मोर्चा . ….! – संतोष टाकळे (कॉर्पोरेट सुसंवाद व्यवस्थापक)

बाकी थोड्या वेगळ्या अंगाने याचा विचार केला तर विविध क्षेत्रातले आज एकत्र आलेले हे लाख मराठे एकवटून शिक्षण,रोजगार ,उद्योग, सामाजिक तिढा आणि अशा प्रश्नांच्या मागे लागले तर किमान अंशी यातून तोडगा निघेल. आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल हो… ते काय नुसते मोर्चे काढून मिळणार नाही हे उघड आहे !

गावात दोन एक वर्षा पूर्वी क्षत्रिय मराठा मंडळाची स्थापना झाली . आणि आम्ही मराठे एकत्र आलो .सभासद नोंदणी – वर्गण्या वैगेरे ओघाने आलच म्हणा पण या निमित्ताने इतके मराठे गाव पंचक्रोशीत आहेत हे पहिल्यांदा बघायला मिळाल तुडुंब भरलेला हॉल आणि कार्यक्रम सुरु झाला . पदाधिकारी यांची अपेक्षित भाषण झाली.  आणि मग आंमत्रित नेत्यांची एका पाठोपाठ भाषणांच्या फैरी कुणी म्हणे मराठ्यांवर तसा कायम अन्यायच झालाय, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, आम्ही आजवर माती साठी लढलो आता जाती साठी लढणार …
यातल्याच एका नेत्याने मराठा मुलां – मुलींनी दुसऱ्या जातीत लग्न करण्याला आक्षेप घेतला त्यांच्या मते म्हणे आपल्याच पोरी बाहेर गेल्या तर आपल्या पोरांनी काय करायचं इत्यादी इत्यादी तास भर वैचारिक कुटा कुटी झाली . लोकांच्या टाळ्या वैगेरे पडल्या. पण कुणा एकानेही मराठा समाजातल्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला नाही .उलट आरक्षणामुळे मराठ्यांना नोकऱ्या कशा मिळत नाहीत हे अधिक रंजक पद्धतीने मांडण्यात आल. कार्यक्रमात सहभागी असलेल्या तरुण मुलांना यामुळे अधिक चेतवण्यात भर पडली .
हा आरक्षण एकजूट वैगेरेचा उत्साह मोजून सहा महीने टिकला आणि मग प्रकरण थंड पडलं .मधल्या चार पाच मीटिंगा सोडल्या तर विशेष काही घडल नाही. पुन्हा वर्षभराने कार्यक्रमाचं निमंत्रण आलं.. म्हणाले तुम्हाला याव लागेल.. समाजाचा प्रश्न आहे. म्हटलं.. “सॉरी, नाही जमणार! गेल्या कार्यक्रमात आपण स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावे, लघुउद्योग कार्यशाळा ,करियर गाइडन्स, महिलांसाठी घरगुती उद्योग प्रशिक्षण शिबिर इत्यादि कार्यक्रम आखले होते .त्यापैकी एकही कार्यक्रम घ्यायला तुम्हाला टाइम नाही. उलट जाहिराती घेउन पदधिकाऱ्यांच्या फ़ोटो सहित दिनदर्शिका छापायला मात्र तुम्हाला वेळ मिळाला. तरुणांना आश्वासक वाटावं म्हणून आमच्या तरुणांची भाषण ठेवत नुसता कार्यक्रम घेण्यात काय अर्थ आहे?” त्यावर त्याच्याकडे उत्तर नसावं बहुतेक, पण कार्यक्रम ठरल्या दिवशी झाला . पाहुणे आले त्यांच औक्षण झाल. नेत्यांची भाषण, गुणवंत मुलांचे सत्कार झाले आणि पुढे काहीच नाही. याला आता दुसरं वर्ष उलटलं.
आज लाखोंच्या संख्येत मराठा मोर्चे काढतोय हे चित्र जितकं आश्वासक तितकच ते अनिश्चित वाटतय मराठ्यांना नेता नाही हे वास्तव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालय. फक्त आरक्षण हा एकमेव मुद्दा नाहिये ह्या उद्रेकाचा! तर आजवर आपण का एकत्र आलो नाही ह्या संतापाची ही प्रतिक्रिया आहे .पण ह्या निमित्ताने तुम्ही प्रती काढलात तर आम्ही अति काढु ही तेढ़ हळूहळू अधिक वर येत राहणार आणि मग त्यातून मूळ उद्देश बाजूला राहून जाती जातीतल्या वादाच्या विकोप्याचा महासंग्राम उभा राहणार हे निश्चित!
मुंबईतला मोर्चा देखील गाजला.. खरंतर तो जाणीव पूर्वक गाजवला गेला ह्यामागे नक्की राजकीय समीकरण काय हे उलगडून बघण्याचं विचारवंतांनी मनावर घेतलं नाही किंवा एक मराठा लाख मराठा ह्या महागर्जनेत हे सगळं विरलं असावं बहुतेक!
राणीच्या बागेपासून सुरु झालेल्या मोर्च्याला जे कव्हरेज मिळाल ते लक्षणीय की यात सहभागी झालेल्या लोकांची संख्या लिडिंग माध्यमांची यावरची चर्चा विसंगत होती . दरम्यान भाजप चे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री आता महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे असं भाकीत करणं, अधिक गोंधळात टाकणार होत . दरम्यान आशिष शेलार यांना झालेली धक्का बुक्की , नितेश राणे यांनी स्टेज वर जाणं , अजित पवार यांनी रस्त्यावर उतरत मोर्च्यात सामील होणं,  संभाजी राजे यांनी मोर्चेकरांसोबत जमिनीवर बसणं सगळंच पॉलिटिकल फेव्हरिजम च्या ट्रॅकवर जाणारं म्हणता येईल. पण तरीही मागच्या काही वादग्रस्त मोर्च्यांच्या तुलनेत, यात लाखो लोक एकत्र येतात शिस्तीत सगळा मोर्चा विसर्जित होतो हे बदल सकारात्मक म्हणता येतील.
बाकी थोड्या वेगळ्या अंगाने याचा विचार केला तर विविध क्षेत्रताले आज एकत्र आलेले हे लाख मराठे एकवटुन शिक्षण ,रोजगार ,उद्योग, सामाजिक तिढा आणि अशा प्रश्ननांच्या मागे लागले तर किमान अंशी यातून तोडगा निघेल. आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल हो… ते काय नुसते मोर्चे काढून मिळणार नाही हे उघड आहे .
इतर समाजातल्या संस्था संघटना यांचा गांभीर्याने अभ्यास व्हायला हवाय! जैन समाजाच्या संघटनांचं घ्या! समाजासाठी हे लोक प्रामाणिक बांधिल आहेत. समाजातल्या आर्थिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या समाजबांधवांसाठी यांच काम उल्लेखनीय आहे.शिक्षणा संदर्भात यांच काम बघाल तर पूर्वी फक्त व्यवसायात माहिर असलेला ह्या समाजातला तरुण वर्ग आज मोठ्या प्रमाणात IPS ,IRS ,प्रशासकीय अधिकारी ह्या बड्या हुद्यांवर कार्यरत आहे. अल्पसंख्याक असूनही त्यांना कुठे आहे आरक्षण? अर्थात आर्थिक दृष्ट्या ह्या समाजातले बहुतांश लोक गर्भ श्रीमंत आहेत  हे वास्तव नकारता येणार नाही. पण त्यांनी जे अचिव्ह केलंय. कारण त्यामागं त्यांचा समाज खंबीर उभा आहे .
खरतर आरक्षण, विशेष सवलती वैगेरे ह्या गोष्टी तशा गौण आहेत. मुळात आपली सकारात्मक मानसिकता, excellent educational power, helping community , achievement साठीचं डेडिकेशन आणि सर्वात महत्वाच म्हणजे सामाजिक सौख्य! ह्याने समाज उभा राहतो. बाकी समाज धुमसत ठेवत राजकीय अजेंडा राबवायला वादग्रस्त प्रकरण अधिक चिघळवणं हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही…
                                                                      – संतोष टाकळे
Previous Article

आचार्य अत्रे

Next Article

लवकरच!

You may also like